आमची प्रेरणा अदितीताईंची सुंदर कविता ताळमेळ
काव्य हे जुळे कधी कधी उगाच शब्दभेळ
हा जमायचा तुला न "केशवा" कधीच खेळ
सभ्य वाटतो जरी, कळा अनेक अंतरात
ही विडंबने तुझी कुणी अता न वाचतात
ऐकवे कुणा न हा तुझा टुकार वाद्यमेळ ॥
काव्य पाहता तुझे मनात जागतो छचोर
अन मनातल्या मनात हासतो मी अघोर
लोक हासता खुलून, सोडतोस ताळमेळ ॥
काव्य फाडतोस वाट लावतोस तू टपून
एकदा तुला खरेच काढणार झोडपून
ये सुमार "केशवा" पहा तुझी भरेल वेळ !!
--केशवसुमार
(माघ वद्य ७ शके १९२९,
२८ फेब्रु. २००८)