भरलेली भेंडी

  • साधारण १/२ भेंडी
  • सुके खोबरे, तिखट, हळद, गरम मसाला, मीठ
  • गुळ किंवा साखर
  • आमचुर पावडर किंवा लिंबाची पावडर
  • एक कांदा, लसुण पेस्ट
  • तेल
४५ मिनिटे
२-३ जण

१. प्रथम भेंडी धुवून कोरडी करावी, भेंडीला उभा काप द्यावा.
२. नंतर मसाला बनवून घ्यावा. मसाल्याची कृती
३. आधी सुके खोबरे भाजून घ्यावे, ते मिक्सर मध्ये बारिक करावे. जरा जाडे भरडेच थेवावे.
४. कांदा बारिक चिरून घ्यावा, लसणाची पेस्ट करून घ्यावी.
५. नंतर खोबरे घ्यावे, त्यात कान्दा, लसणाची पेस्ट, तिखट, हळद, गरम मसाला, मीठ तसेच
    आमचुर पावडर किंवा लिम्बाची पावडर, गुळ किंवा साखर चवीनुसार घालवे.
६. हे मिश्रण सरळ हाताने कालवून घ्यावे. गुळ किंवा साखर व मीठ यामुळे मसाला छान ओलसर बनतो.
७. हा मसाला भेंडी मध्ये भरवा.
८. कढईत तेल टाकून त्यावर ह्या भेंड्या फ्राय कराव्यात.
९. लहान ग्यास वर ह्या भेंड्या होवू द्याव्यात. नाहितर नीट फ्राय होत नाहित.

आमचुर पावडर किंवा लिंबाची पावडर वापरल्याने आंबट गोड छान चव लागते. जर आवडत नसेल तर टाकू नये.
खोबरे जास्त भाजू नये...

करून बघा.....आणि सांगा आवदली कि नाही ते...

सहज करुन बघितली.