(गझल)

अजून आहे ठरायचे, उठायचे की 'बसायचे'
इथे न ओठांस ओलही, कसे कुणी आज़ प्यायचे ?

ओळओळ इकडेतिकडे पाडायाचा सोस जुना!
आयत्याच या कविता घ्या, स्वत: कशाला लिहायचे ?

प्रिये तुझ्या त्या बापाचे हात नव्हेतच नाजुकसे!
(गालांवर कडकडलेल्या विज़ांस कैसे स्मरायचे ?)

वेगवेगळ्या कवितांचे मिळत ज़ात आंदण आहे
अंतर दोनच मिनिटांचे, मागे कां मी पडायचे ?

कां पेल्यातून शेवटच्या करावीस मैफल हळवी ?
पेय अनावर झाले तर, पोट दाबुनी धरायचे