नाही कसे रे मी म्हणू

नाही कसे रे मी म्हणू

होकार येता साजणा  मनमोर माझा नाचला
नाही कसे रे मी म्हणू ?हा जीव होता गुंतला..

झाले  कधी ना साध्य  जे मज  वाटले मज  लाभले
(होता तसा  हरएक  रस्ता मृगजळाने व्यापला)

गेलास तू दूरवर अन् मागे इथे मी राहिले
प्रीतीस माझ्या कोणतासा शाप होता भोवला...

ज्या लाघवी होत्या स्मृती कवटाळुनी मी घेतल्या
काट्याप्रमाणे बोचऱ्या ठरल्या  परंतू त्या  मला..

देते स्वतःला रोज मी खोटीच  आता  सांत्वना
सोडून  जाते सावली अन् जीव हा वेडावला

खुलल्या नभी या चांदण्या पाहून त्यांचा सोबती
 माझ्या मनीचा चंद्रमा कोठे कळेना लोपला
नाही कसे मी म्हणू? हा जीव होता गुंतला..

-सोनाली जोशी