मज सांग ए मना तू

मज सांग ए मना तू

मज सांग ए मना तू, जडशी कुणावरी तू, तो कोण असे जो येऊन, स्वप्नी करी धमाल ॥ धृ ॥

मस्तीभरे हे गाणे का रात गातसे ही, का झोप दूर जाते डोळ्यांत येऊनीही ।
अवखळ करून गेला, आशा मनी उजागर, तो कोण असे जो येऊन, स्वप्नी करी धमाल ॥ १ ॥

बेकाबू होत आहे, मन हे उचंबळून, बहुतेक रात जाईल, कुशीवर वळू वळून ।
सावर जरा मना तू, आलेला आहे बहुधा, तो कोण असे जो येऊन, स्वप्नी करी धमाल ॥ २ ॥

सारी हवाच सर्द, ऋतू रंगला गुलाबी, तो चंद्र, चांदणे ते, मयसृष्टी धुंद सारी ।
ऐकवून कुणी गेला, हळूवार गीत एक, तो कोण असे जो येऊन, स्वप्नी करी धमाल ॥ ३ ॥

मराठी अनुवाद नरेंद्र गोळे २००८०१३०

चालः मूळ गाण्याचीच. मात्र मूळ हिंदी गाणे ओळखावे लागेल.