तटस्थ

कधीतरी निवांत मी बसेन जीवनाकडे
कधीतरी तटस्थ मी बघेन जीवनाकडे

म्हणावयास शोधतोय पैलतीर मी जरी
अखेरच्या क्षणी पुन्हा सरेन जीवनाकडे

उगाच श्वास मागुनी नकोस त्यास लाजवू
अजून राहिली नसेल देन जीवनाकडे

भिऊ कशास पाहुणा तुझा बनावयास मी
यमा तुझ्या घरात काय जे न जीवनाकडे ?

"शिरावरी तुझ्या असे, मिलिंद, बोज कोणता ?"
मिटून ओठ बोट दाखवेन जीवनाकडे...