जैव वैविध्य

जैव वैविध्य

आंब्याच्या झाडावर बसले सात कावळे
काव काव काव काव काव काव काव

निळ्याशार समुद्रात पाणघोडा पाणघोडी
त्यांची सदतीस पिल्ले खेळती झुकझुकगाडी

एकदा मध्यपूर्वेच्या वाळवंटात मोठे वादळ झाले
तेव्हा सर्व अरब फक्त उंटीणघेऊन पळाले

ताडोबाच्या अभयारण्यात मोर आणि मोरी
पण त्यांना होती एकमेकांना भेटायची चोरी

एक होता नर, एक होती मादी,
पण काय करावे? दोघेही होती साधी
अगं तू आधी, अरे तू आधी
या वादात दोघांना पुरत नसे गादी

                      

हिला सामान्य मराठीत जरी सांडणी म्हणत असले तरी नवकवितेच्या भाषेत उंटीण असेच म्हणतात.
 जो नियम सांडणीसाठी तोच लांडोरीसाठी...
हे फक्त झोपण्याबाबत होते. सुज्ञ वाचक भलताच गैरसमज करून घेणार नाहीत ह्याची खात्री आहे...