लुब्रा स्वभाव

आमची प्रेरणा महेश यांची संदर प्रायोगिक कविता/गझल लुब्रे पडाव

भरला बघून पेला मी हंगरून गेलो
गोडीत पेग उष्टा मी लंगरून गेलो

शंका कुणा न आली की आत काय आहे
ग्लासास स्टिलच्या  या मी ड्रिंकरून गेलो!

काठीजरी करी या बघण्यात मग्न पोरी
लुब्रा स्वभाव माझा, मी यंगरून गेलो

मज लागले कळाया सारे तिचे इशारे
भलताच अर्थ कळता मी गांगरून गेलो

कवटाळण्या मला ती आली उठून लगबग 
बाहूंमधे तिच्या त्या मी चेंगरून गेलो

टीप :

हे विडंबन सुमारे दोन दिवसांपूर्वी अर्धवट लिहिले होते, ते आज पूर्ण करावेसे वाटले / करता आले. विडंबनात इतरभाषिक शब्द बेमालूमपणे मिसळण्याचा प्रयोग(!) ह्या विडंबनात केलेले दिसतील. क्षमस्व.