चित्रपट गीत ओळखा

हृदयाचे खेळणे हाय तुटून गेले

कोणी लुटारू येऊन लुटून गेला..........

झाला काय गुन्हा असा सजणा रे माझा

जाताना तू मला आवाज न दिला

प्रीतीची तार तोडलीस, मला प्रवाहात सोडलस

मी तर तुझ्याच मदतीने चालत होते

जोडीदार माझा, मजकडून सुटून गेला

कोणी लुटेरा येउन लुटून गेला............

कशी परदेशीयावर प्रीती केली

सुख ही हरवले, झोपही उडाली

तुझा भरवसा करून, तुझी प्रतीक्षा करून

आनंदाऐवजी दु:खाचे जग वसवले

दुष्ट समाज माझ्यावर रागवला

कोणी लुटारू येऊन लुटून गेला..........."

"<! --break-->"

श्री. नरेंद्र गोळे यांच्या अनुवादांनी मी प्रभावित झाले. म्हटलं आपल्याला जमतय का पाहावं.

अर्थात त्यांच्यासारखं सफाईदार मला जमलेलं नाही. काही ठिकाणी तर मी अडखळले......

चतुर वाचकांच्या ते लक्षात येईलच. पण पहिलाच प्रयत्न आहे. पुन्हा करावा की नाही ते तुम्हीच

सांगा. तर मंडळी ओळखा बरं हे हिंदी चित्रपट गीत!