(स्वप्न)

आमची प्रेरणा धोंडोपंतांची सुरेख गझल स्वप्न

बायकोची काय अमुच्या रीत आहे?
बुकलुनी म्हणते वरी ही प्रीत आहे

आज पण घेऊन झाडू स्वागताला
बायको अमुची उभी वस्तीत आहे

राहिली आता न मजला शुद्ध साधी
मोडले पेकाट मी निपचीत आहे

आठवण गेली तुझी चुकवून ठोका
मी पुन्हा आता तिच्या धास्तीत आहे

"केशवा"पुन्हा नको ते स्वप्न पाहू
कालचा इतिहास हा स्मृतीत आहे

----केशवसुमार