पुरातन वस्तू संग्राहक

आपल्या महाराष्ट्रात इतिहासाचा, पुराणाचा जाज्वल्य अभिमान बाळगणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. ऐतिहासिक गोष्टींचा संग्रह करण्याची इच्छा, हौस बऱ्याच जणांना असते. आपल्याला जमेल, झेपेल तसे प्रयत्नही ही मंडळी करताना दिसतात.

अशाच तऱ्हेची आवड संपतरावांना होती. कुठे, कोणत्या प्रकारच्या ऐतिहासिक वस्तू मिळतील याबाबतीत ते जागरुक असत.

अशीच एकदा त्यांच्या कानावर बातमी आली की, पेशवेकालीन तलवारीचा लिलाव होणार आहे.

झालं, उत्साहाचे वारं अंगात शिरले. तडक बँकेत गेले. तब्बल रु. २५, ०००/- रोख रक्कम काढली. ही रक्कम वेगवेगळ्या नोटांच्या स्वरुपात होती. म्हणजे १००, ५०, २०, १०, ५, २ आणि १ या स्वरुपात नोटा होत्या.

सवयीप्रमाणे लिफाफे जवळ होते. मात्र यावेळेला त्यांची संख्या १५ होती. ही रु. २५, ०००/- ची रक्कम या १५ लिफाफ्यांमध्ये वाटून भरली.

हे करताना एका नियमाचा वापर केला तो असाः

            प्रत्येक लिफाफ्यामध्ये नोटांचे स्वरुप कमीतकमी होते. उदाहरणार्थ,

             १. समजा एका लिफाफ्यात रु. १५० ठेवले आहेत. तर १०० ची एक नोट व ५० ची एक नोट हे बरोबर आहे.

                 पण ५० च्या ३ नोटा हे चुक आहे.

             २. समजा एका लिफाफ्यात रु. १२० ठेवले आहेत. तर १०० ची एक नोट व २० ची एक नोट हे बरोबर आहे.

                पण ५० च्या २ नोटा, २० ची एक नोट अथवा ५० च्या २ नोटा, १० च्या २ नोटा अथवा १०० ची एक नोट, १०

                च्या २ नोटा; हे चुक आहे.

तलवारीचा लिलाव सुरू झाला. सुदैवाने, संपतरावांनी लिलाव जिंकला. ती तलवार त्यांची झाली फक्त रु. ८, ३२२/- मध्ये.

रक्कम सुपुर्त करताना त्यांनी न बघता लिफाफा क्र. २, ८ व १४ दिले व तलवार ताब्यात घेतली.

आयोजकांनी लिफाफे उघडले व एकुण रक्कम बरोबर रु. ८, ३२२/- होती.

प्रश्नः

१. लिफाफा क्र. २, ८ व १४ मध्ये प्रत्येकी रक्कम किती होती?

२. या तीन लिफाफ्यामध्ये मिळून रु. १ च्या किती नोटा होत्या?