हे रूपवती तू जाग तुला प्रेम पुकारे

हे रूपवती तू जाग तुला प्रेम पुकारे

हे रूपवती तू जाग तुला प्रीत पुकारे ।
बदलेल माझे दैव जर तू जागशी सखये (२) ॥ धृ ॥

प्रेमाची ही गीते आणि संगीत हे प्रीतीचे ।
अपेक्षेने तुला ऐकवायला आणले सये हे ।
आशा न मनाची माझ्या होवो निराश गे ॥ १ ॥

संगीतात सूप्त, हृदयीच्या जागव तू शोकगीत ।
आवाजामध्ये माझ्या तुझा स्वर मिसळ तू ही ।
खूप आस घेऊनी मी तुझ्या द्वारी आलो आहे ॥ २ ॥

हे ज्योती तू आवरणाच्या बाहेर निघून ये ।
आगीत तुझ्या जळून जाण्याची इच्छा आहे ।
समर्पित न जो तुजवर, त्या पतंग न म्हणवे ॥ ३ ॥

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०७०६

मूळ हिंदी गीत ओळखा.