स्पर्शूनी मना

स्पर्शून, मना ह्या, का दिधली, तु साद
फिरता ही दृष्टी, भासे हे जग मज छान

म्हणता तु अशी जर, तुजस्तव मी गावे,
तुजस्तव मी गावे.
गीत तुझ्या शब्दावर, लिहीता मी राहावे,
लिहीता मी राहावे.
माझ्या, कवितेतून, तुज शोधी जन सारे.....

सखे तुझ्या स्वप्नावर, प्रीती मी किती उधळू
प्रीती मी किती उधळू
सुखं ह्या दुनियेतील, तुजस्तव ही कवळू
तुजस्तव ही कवळू.
तुची, माझे स्वप्ने, तुची आधार जणू.....

श्री. टवाळ व श्री. नरेंद्र गोळे यांच्या अनुवादांनी हिंदी गाण्याला चांगलीच मराठी रंगत आणली, स्मिता चावरेनी ही छान जमवलं. आपणही बघू म्हटलं एखादा प्रयत्न करून... तर मित्रहो ओळखा हे हिंदी चित्रपट गीत. चाल मूळ हिंदी गीताचीच.

रचनेत काही आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा.