'हिंदुस्तानी ग़ज़लें' ह्या पुस्तकातील श्री. किशन तिवारी ह्यांची एक आशय-संपन्न ग़ज़ल अलिकडेच वाचण्यात आली.तिच्यातील ५ निवडक शेरांच्या स्वैर भावानुवादाचा हा प्रयत्न.
चित्रास दोन बाजू ह्या...
चित्रास दोन बाजू ह्या, पलटून तर पहा
अपुली कथा स्वत:स तू सांगून तर पहा
का वाटते तुम्हास शांति क्षुद्र खेळणे?
जे तोडले अनेकदा; जोडून तर पहा
सांडून रक्त-पाट हे इतिहास बनविला
जा, एक थेंब अश्रूहि गाळून तर पहा
जोपासले भ्रमास ज्या, तुटतील ते क्षणी
जा, आरश्यास चेहरा भिडवून तर पहा
हे मार्ग वाहती तुडुंब, ध्येय ना दिसे
अपुली स्वतंत्र वाट तू बनवून तर पहा
-मानस६
मूळ ग़जल
दो रुख की है तस्वीर घुमाकर तो देखिए
खुद की कहानी खुद को सुनाकर तो देखिए
है अम्न आपके लिये मिट्टी का खिलौना
तोडा है कई बार बनाकर तो देखिए
नदियॉं बहा के खून की इतिहास रच दिया
ऑंसू की एक बूँद गिरा कर तो देखिए
पाले हुए ये सारे भरम टूट जाऍंगे
खुद आइनों से ऑंख लडाकर तो देखिए
इन रास्तों पे भीड है, मंजिल नहीं पता
खुद एक अपनी राह बनाकर तो देखिए
- किशन तिवारी ( 'हिंदुस्तानी ग़ज़लें' मधून साभार)