वैराने का होईना मन मोडण्यास ये

वैराने का होईना मन मोडण्यास ये

वैराने का होईना मन मोडण्यास ये
पुन्हा मला सोडून जाण्यासाठी तू ये

पूर्वीचे न संबंध काही तरीही कधी तू
दुनियेचा रिवाज निभावण्यास तरी ये

कुणा कुणास सांगू मी विरहाची कारणे
मजवर तू नाराज, तर इतरांसाठीच ये

काही तरी प्रेमाची तू राख लाज रे
माझीही मनधरणी तू करण्यास कधी ये

क्रंदनानंदापासूनही कधीचाच मी वंचित
हे आत्मानंदा, तू मला रडवण्यास तरी ये

अजूनही समजदार मना, आशा आहे तुजकडून
या ज्योती शेवटल्याही, मालवण्यास तरी ये

खालील अशर तालीब बागपती यांनी लिहीली आहे
पण मेहदी हसन याच गझलेचा भाग म्हणून गातात.

हे खरे की लपवणे प्रीतीस, ही खरी प्रीत
एखादे दिवस हळूच, हे पटवण्यास कधी ये

येतात जशा सबबी तुला, न येण्याच्या नेहमी
एखादे दिवस तसाच, न परत जाण्यासाठी ये

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०८२७

ही गझल नाही. प्रसिद्ध गझलेचा मराठी भावानुवाद आहे हा.
गझलप्रेमींना विनंती आहे की त्यांनी उदार मनाने भाव जाणून घ्यावा.

ओळखा पाहू मूळ लोकप्रिय हिंदी गझल.