मनोगतचा नवीन चेहरा...

                             आज दिवस सुरू झाला तो नेहमीप्रमाणेच. तोच तो चहा, न्याहारी, तीच तीच सकाळची कामे, तेच ते ऑफिस, थोडक्यात काय तर नवीन, विशेष, उत्साही असे काही घडले नाही. अशातच 'तेच ते' काम करत असताना, 'तोच तो' कंटाळा आला, म्हणून 'त्याच त्या' संगणकाच्या मूषकावर टिचकी मारून मनोगत उघडले. मनात म्हणालो, आता 'तेच ते' मनोगत उघडेल. परंतु झाले काही निराळेच. आपले मनोगत 'तेच ते' न राहता, त्याने आता नवीन साज लेऊन एखाद्या चित्रपटाततील नायका सारखी 'एंट्री' च मारली जणू. मनाला आलेला सर्व क्षीण अचानक नाहीसा झाला.  
                          फारशी नवीन अंगे वाढली नसली(अंगे वाढली असतील आणि माझ्या नजरेत कदाचित आली नसतील तर क्षमस्व!    ) तरी मांडणी आवडली. 'स्वागतार्ह बदल' एवढे नक्कीच म्हणू शकेन. त्याबद्दल प्रशासकांचे मन:पूर्वक आभार! असेच बदल येऊ देत. मनोगतींना काही सुधारणा, नवीन कल्पना सुचवावयाच्या  असल्यास  इथे जरूर मांडाव्यात हि नम्र विनंती!