ताकातली भेंडी.

  • भेंडी अर्धा किलो.
  • लाल तिखट १ टी स्पून
  • हळद अर्धा टी स्पून
  • जिरे १ टी स्पून
  • ताक २ वाट्या
  • मीठ चवी पुरते
  • कोथिंबीर २ टेबल स्पून
  • तेल पाव वाटी.
३० मिनिटे
चौघांसाठी.

कधीही भेंडी घेताना, कोवळी, हिरवीगार, मध्यम आकाराची पाहून घ्यावीत. भेंडीचे टोक (देठाकडचे नाही, विरूद्ध बाजूचे), भेंडी मुठीत धरल्यावर, अंगठ्याने चट्कन मोडले पाहीजे. 

भेंडी स्वच्छ धुवून, पातळ कपड्याने नीट पुसून कोरडी करून घ्यावी. नंतर, दोन्ही टोके काढून टाकून, भेंडीचे २ इंच लांबीचे तुकडे करून घ्यावेत. 

कढईत तेल तापवून फोडणीला जिरे टाकावे. जिरे तडतडल्यावर, भेंडीचे तुकडे टाकून परतून घ्यावेत. भेंडी अर्धी शिजल्यावर तिखट, हळद, मीठ आणि ताक घालून भाजी मिसळून घ्यावी. मंद गॅसवर भाजी शिजवून ताक जरा आटले की खाली उतरवावे. जेवण्या आधी कोथिंबीर भुरभुरून घ्यावी.

शुभेच्छा...!

धुतलेली भेंडी कोरड्या फडक्याने नीट पुसून घ्यावीत.

भेंडी तेलात पूर्णपणे परतण्या आधी ताक, किंवा पाणी टाकू नये. 

भेंडी शिजवताना कधीही झाकण ठेवू नये.

वरील सूचना न पाळल्यास भाजीला तार सुटण्याची शक्यता असते.