जूईची कळी माझी लाडकी

जूईची कळी माझी लाडकी

जूईची कळी माझी लाडकी
लाडात वाढली माझी लाडकी
आशेची किरण युग युग तू जग ए
छोटीशी परी माझी लाडकी
ओ माझी लाडकी

धरतीवर उतरला चंद्र, तुझा चेहरा झाला
चाफ्याच्या फुलांचा गुच्छ तुझा मोहरा झाला
ओ माझी लाडकी
फुलपाखरू माझी लाडकी
हिरकणी शोभे माझी लाडकी
आशेची किरण युग युग तू जग ए
छोटीशी परी माझी लाडकी
ओ माझी लाडकी

लाजे दिवाळी ताऱ्यांची तुझे डोळे पाहून
घेतला कोकिळेने पंचम तव आलापांतून
ओ माझी लाडकी
बाहुलीपरी घडली माझी लाडकी
मला वाटे भली माझी लाडकी
आशेची किरण युग युग तू जग ए
छोटीशी परी माझी लाडकी
ओ माझी लाडकी

हर बोल तुझा दुःखाशी लढा आम्हा सांगे
तुझे हास्य जरा धीर धरा आम्हा सांगे
ओ माझी लाडकी
गंगेची लहर माझी लाडकी
चंचल सागर माझी लाडकी
आशेची किरण युग युग तू जग ए
छोटीशी परी माझी लाडकी
ओ माझी लाडकी

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०८२२

ओळखा पाहू हे मूळ हिंदी गीत. सोपे तर आहेच. पण किती भावस्पर्शी!