महान्यूज : महाराष्ट्र सरकारचे वेबपोर्टल

आजच्या ईसकाळात ही बातमी वाचायला मिळाली.

'महान्यूज'द्वारे ई-जगात राज्य सरकारचे पदार्पण - मुख्यमंत्री

(बातमीचा गोषवारा)

मुंबई, ता. १९ - महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने "महान्यूज' या वेब पोर्टलच्या रूपाने आज ई-जगात प्रवेश केला. देशातील हे पहिलेच शासकीय ई-पोर्टल आहे.
मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते आज सकाळी "वर्षा' निवासस्थानी या उपक्रमाचे उद्घाटन झाले. "महान्यूज'मुळे जगाच्या पाठीवरील समस्त मराठी भाषक आणि माध्यमांना शासनाचे निर्णय, कार्यक्रम व विविध उपयुक्त विषयांवरील माहिती मिळणार आहे. ...

महान्यूज असा या पोर्टलचा पत्ता आहे. "महान्यूज'मध्ये एकूण १५ सदरांचा समावेश असून, दररोज ती अपटेड करण्यात येणार आहेत. महाइव्हेंट, ई बातम्या, साक्षात्कार (मुलाखती), महासंस्कृती, शलाका (व्यक्ती परिचय), तारांकित (नावीन्यपूर्ण उपक्रमांची ओळख, चौकटीबाहेर, आलेख, फर्स्ट पर्सन, गॅलरी (छायाचित्रे), महाऑप (रोजगार संधीची माहिती), हॅलो (वेब-पोर्टल वाचकांच्या प्रतिक्रिया), लोकराज्य, दिलखुलास व जय महाराष्ट्र या सदरामुळे महान्यूज परिपूर्ण ठरेल, असे कळते.

अजून सगळे पोर्टल वाचून बघितले नाही मात्र मराठीत आणि तेही युनिकोडमध्ये आहे हे योग्यच आहे असे वाटते.