मराठी माणूस आणि दिवाळी अंक: दृढ नाते!

मराठी माणसाची दिवाळी ही "दिवाळी अंकांशिवाय" अपूर्ण असते, यात दुमत नाही.  या वर्षी (२००८) कोणकोणते दिवाळी अंक बाजारात आलेत, किंवा यायचे आहेत आणि कोणते आपण वाचलेत, ते आपल्याला कसे वाटलेत, या विषयी ही चर्चा.

या चर्चेच्या माध्यमातून आपण वाचलेले दिवाळी अंक इतरांना वाचण्याची शिफारस करू शकतो.

काही ऑनलाईन दिवाळी अंक सुद्धा निर्माण होत आहेत असे ऐकले. पण, छापील अंक वाचण्यात जी मजा, जो आनंद आहे तो ऑनलाईन दिवाळी अंक वाचण्यात नक्कीच नाही. पण जे ऑनलाईन अंक उपलब्ध आहेत, ते एकमेकांना सांगू शकतो.

छापील दिवाळी अंकांची ही महाराष्ट्राची मराठी माणसाची अनोखी परंपरा अखंड चालत राहो, ही अपेक्षा. लहान पणी सुद्धा दिवाळी अंकांशिवाय एकही दिवाळी साजरी केली तरी, मला ती अळणी वाटायची.

दिवाळी अंकांच्या वाढत्या किमती, तसेच कालानुरूप त्यात झालेले बदल या सगळ्या गोष्टी आपण चर्चेत सामील करूयात.

मनोगतचा या वर्षीचा (२००८) दिवाळी अंक कसा असेल, ही उत्सुकता आहेच.