विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्व मनोगतींना हार्दिक शुभेच्छा!

भारतीयांच्या विजिगिषू वृत्ती अशीच वाढीला लागो! पुढचे दशक, शतक नव्हे सहस्त्रक देखील आमचेच आहे!

भारतीयांनी जीवनाच्या सर्व क्षेत्रात आघाडीवर राहून अखिल जगात वंदनीय व्हावे,   भारताने पुन्हा जगद्गुरू व्हावे आणि प्राचीन भारतीयांनी दाखवलेल्या प्रेमाच्या मार्गावर सर्व जगाने चालावे, भारताला पुनर्वैभव प्राप्त व्हावे, हीच आकांक्षा!

एतद्देश प्रसूत्स्य सकाशादग्रजन्मना / स्वं स्वं चरित्रं शिक्षेस्न पृथ्विव्यां सर्वमानवां: //

(पृथ्वीवरील सर्व मानवांनी या देशात जन्मलेल्या पूर्वसुरींकडून चारित्र्याची शिकवण घ्यावी! )

आजच्या दहशतवादाच्या काळ्या पार्श्वभूमीवर प्रेम, शांती आणि सद्भाव याची  कधी नव्हे इतकी आवश्यकता आहे!   हा सद्भाव जगात वाढीस लागो.

या विजयपर्वात पराभव रावणाचाच आहे, पराभव कौरवांचाच आहे, असा विश्वास ठेवून आपण आपला खारीचा वाटा उचलूया,

 विजयासाठी हार्दिक शुभेच्छा!