अर्धा किलो कोबीच्या सळप्या (फ्राईड राईसमध्ये घालतो तसे उभे लांबट तुकडे) काढाव्यात.
फोडणी - मंद आचेवर कढईत अर्धी वाटी तेलात प्रथम मोहरी तडतडवावी. तडतडण्याचा आवाज थांबला की लगेच उडिद डाळ घालावी. ती लालसर झाली की त्यात ४-५ पाने कढीलिंब, एक कमी तिखट मिरची मध्यात चिरून, अर्धा चमचा जिरे, हळद थोड्या थोड्या वेळाने घालावे.
मग चिरलेला कोबी घालून उलथण्याने हे मिश्रण नीट सारखे करावे. मग अर्धा इंच आले नीट ठेचून त्यात घालावे. सोबत चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा साखर घालावी. ५ मिनिटे कढईला पूर्ण झाकेल असे झाकण घालून मंद आचेवर ही भाजी शिजू द्यावी. मग झाकण काढल्यावर कोबीला पाणी सुटलेले दिसेल. मग उलथण्याने भाजी पुन्हा पुन्हा खालीवर करावी आणि कोबी पारदर्शक दिसला की विस्तव बंद करून त्यावर ओले खोबरे पेरावे.
आता भाजी खायला घ्यावी.
कोबी अर्ध कच्चा शिजवावा. तो जास्त शिजला तर भाजी छान लागत नाही. मिरच्या २ पण घातल्या तरी चालतात पण आल्यामुळे भाजी जास्त तिखट व्हायची पण शक्यता असते.
भाजी झाली की ती कढईच्या बाजूंना थोडी वर चढवून ठेवावी. फोडणीचे तेल कढईच्या खोलगट भागात जमा होते. ही बिनतेलाची भाजी वरच्या वरती काढून घ्यावी व निथळून आलेल्या तेलात जाड पोहे घालावेत. हे जाड पोहे भाजून, साखर, मीठ, फरसाण, खोबरे घालून खावे.
हीच भाजी पुरीच्या सारणात भरून कोबीच्या करंज्या पण करता येतात. ह्या भाजीत वाटाणे घालणे ऐच्छिक आहे.
घर
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.