मालेगाव स्फोटांचे प्रश्न

प्रस्तुत चर्चेकडे बॉंबस्फोटांचं वा दहशतवादाचं समर्थन या नजरेने पाहिलं जाऊ नये.
मालेगाव स्फोटांच्या तपासामागून उद्भवलेले काही प्रश्न आपल्यासमोर मांडतो आहे.
 
दै. सामनामधली ही बातमी हे तात्कालिक कारण -
 

  
आजवर झालेल्या सगळ्या बॉबस्फोटांत
- अशी थर्ड डिग्री लावल्याच्या बातम्या कधी प्रसिद्ध झाल्या का?
- धार्मिक नेत्यांचा हात असल्याचे संकेत कधी दिले गेले का?
- तसा तो नसेलच का?
 
मालेगाव स्फोटांच्या कुठल्या ना कुठल्या संदर्भात सगळी माध्यमे ’हिंदू हिंदू’ म्हणून सर्रास भुई थोपटून घेत आहेत.
आजवर झालेल्या सगळ्या बॉबस्फोटांत
- सापडलेल्या आरोपींची डीटेलवार कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांचे कुणाकुणाशी कसे संबंध जुळले याच्या रसभरित कहाण्या अशी माहिती माध्यमांनी कधी चवीने चघळली होती काय?
- कधी मुसलमान, इस्लाम, इस्लामी दहशतवाद हे शब्द माध्यमांकडून ऐकायला मिळाले का?
 
देशभर होणारे मुसलमानांचे दंगे, मशीदीत सापडणारी शस्त्रे, गल्लीबोळात होणारे बॉंबस्फोट हे सगळे प्रकार जर एकट्या बाबरी पतनानंतरच्या ’स्वाभाविक’ प्रतिक्रीया आहेत, तर बॉंबस्फोटांची प्रतिक्रीया स्फोट असणारच नाही असं आपण समजतो आहोत काय?
 
८० कोटींचा हिंदू समाज आहे; त्यांतले अपवादात्मक काही चवताळून उठले आणि दुष्कृत्य करून बसले [असं पुढे जर सिद्ध झालं] हे सरकारचं सद्भाग्य! सगळा हिंदू रस्त्यावर उतरण्याची सरकार वाट बघत आहे काय?
 
मालेगाव स्फोटांत रा स्व संघ / विहिंपचा थेट हात आज जरी दिसत नसला तरी हे स्फोट घडवण्यामागे आजवरचा संघाचा विखारी हिंदुत्वाचा (? ) प्रसारच कारणीभूत आहे असा सेक्यूलरवाद्यांचा आरोप आहे. मग आजवर झालेल्या सगळ्या मुसलमानांच्या दंग्यांमागे नि बॉंबस्फोटांमागे कुठल्या प्रकारच्या ’भाव जागरणाची’ कारण मीमांसा आहे?