उपवासाची कचोरी

  • ४/५ बटाटे उकडून किसलेले
  • २ वाटी भगरीचे पीठ
  • ३/४ हिरव्या मिरच्या वाटलेल्या
  • १ नारळ खोवलेला
  • २ चमचे लिंबाचा रस
  • कोथिंबिर
  • पिठीसाखर २/३ चमचे
  • काजू तुकडे
  • बेदाणे
  • तेल
  • मीठ
१ तास
३/४

उकडलेल्या बटाट्यामध्ये १ वाटी भगरीचे पीठ मिसळून घ्यावे.

नॉनस्टिक पॅनमध्ये नारळाचा चव परतून घ्यावा.त्यात इतर साहित्य घालून हे मिश्रण गार करून घ्यावे.

बटाट्याच्या मिश्रणची पारी बनवून त्यात सारण भरून ही कचोरी भगरीच्या पीठात घोळ्वून मंद आचेवर तळावी.

ही कचोरी नारळाच्या चटणी सोबत गरम असताना खावी.