गहिरा धुंदावलेला चंद्र

गहिरा धुंदावलेला चंद्र  मोकळ्या आभाळी
जागरणातच रात सरता, उतरेल का निद्रा तुझ्या डोळी?

आम्ही झुरतो आहोत जिच्यासाठी
मनातल्या प्रश्नांना उत्तर तिचे नाही
कुणी तरी तिला जरा सांगा…
नको गं आता अशी छळू……..

झगमगल्या तारका, देखावे दिपले
प्रवासात माझ्या हे सारेच सखे
दिशादिशांनी जणू खुणावले..
नको ना माझा अंत पाहूस..

गहिरी रात्र, भिजली रात्र
हातात हात, असता ती निकट
सांगीतली असती मनातली गोष्ट
कुणाची तर होऊन जा………….