लाजत लाजत आडोशाला संध्याकाळी माझी हो
संध्याकाळी होशिल माझी रोज अशा, तू राजी हो
जादू नखरे मोहक विभ्रम मादक गंधा लेवुनि तू
झेलत झेलत आवेगांना पुनश्च ताजी ताजी हो
चोरुन बघती श्रुंगाराला झुकवुन माना वेली या
चुंबुन बाहूपाशी मज घे त्यांची ना नाराजी हो
आलम थोडा भिन्न असे हा येथे सारे माफ असे
वस्त्रांच्या स्वातंत्र्याबाबत थोडी तू हलगर्जी हो
प्रणयाची एक बाजी होता ओठ गुंफुनी स्नेहाने
मानुन इच्छा पुन्हा मनाची, प्रणयाची एक बाजी हो