महाराष्ट्रीय जनतेने मराठीची कास धरावी की हिंदुत्वाची की निधर्मीपणाची? का?

सध्या, मतदारांच्या पंचवार्षिय [ पाच वर्षांनी येणाऱ्या, असे मला म्हणायचे  आहे, तरी वितंडवाद्यांनी मथितार्थ घ्यावा] उत्सवाची जोरदार तयारी चालू आहे. त्या अनुषंगाने, बरेच 'जोड-तोड' , 'जुगाड', सामाजिक अभियांत्रीकीय प्रयोग, चालू आहेत वा अपेक्षीत आहेत. आरक्षणासारखे, शेतकरी कल्याणाचे  मुद्दे देखील आहेत. भाषीक अस्मीतेसारखे मुद्दे देखील बेजान [ बाटलीवाला नव्हे ] / निर्जीव [गलीतगात्र म्हणणे जास्त समर्पक] मतदारांमध्ये जीव नक्कीच ओतत आहेत.

निवडणूक कोणतीही असो, लोकसभा वा विधानसभा, महाराष्ट्र वगळता ईतर राज्यांनी स्थानीक पक्षांना भरभरून मत दिले आहे.  उत्तरेकडील अभीजनांनी आनंदाने बहुजनांचा अनुनय केल्याचे उदाहरण नवेच आहे. ते अपवाद आहे की एका नव्या पर्वाची सुरुवात / रुजुवात आहे? [ मताचा कल वा लिनता आहे का? ] असे मला म्हणायचे आहे.

माझे मतः मराठी माणसाने विचारप्रवर्तकाचे कार्य फार आधीपासून केल्याने, हिंदुत्ववाद्यांमध्ये आद्य माणसे मराठीच होती. आजच्या स्थितीत हिंदुत्ववादी माणसांमध्ये , मराठी माणसाचे स्थान नगण्य आहे. ईतकेच काय, देशीय वा अंतर्देशीय वा अंतरराष्ट्रिय     राजकाऱणात मराठी माणसाची ऍलर्जी असल्यागत ईतर लोक यांना वेगळे पाहतात. बरं इथल्या अभीजनांना आपसात 'गट-तट' केल्याशिवाय चैन नाही, तेंव्हा बहुजनांना सामावून घेण्याची शक्यता अत्यल्प.

भरीसभर अतीरेकी राष्ट्रे देखील भारताची संयमपरीक्षा पाहत आहेत. मागच्या ८+५ वर्षांमध्ये , राष्ट्रिय पक्षांमध्ये जणू "राष्ट्रीय अस्मीता" कोण जास्त गमावतो अशी सुप्त स्पर्धा चालू असल्याचे चित्र आहे. विचारी क्रिया नाहीच वर स्वाभिमानी प्रतिक्रिया देखील नाही. प्रजासत्ताकदिनी वा स्वातंत्र्यदिनी दिसणारी संरक्षण सामग्री सामान्य माणसाचे रक्षण करू शकते का? असा सामान्य माणसाला प्रश्‍न पडू लागला आहे.

अशा दिःग्मुढ अवस्थेत, यानेत्यांची वैयक्तीक जरब [जशी शास्त्रीजींची, इंदिराजींची वा नरसिंम्हारावांची होती ] देखील इथे ही नाही अन तिथेही नाही .

इतक्या अंतर्गत विरोधाभासाच्या वातावरणात महाराष्ट्रिय माणुस कोणाचे बोट धरेल?

 सर्वांनी आपापले विचार प्रकट करावेत, मत गुप्तच ठेवावे.

आम्हाला देखील विचारी क्रिया-प्रतिक्रियांची आवश्यकता आहे. सर्वांना, लेखनसाहित्य उपलब्ध आहे. सर्वांनी, किमान ज्ञानार्जन झाल्यानंतर धन्यवाद देण्याची तसदी नक्की घ्यावी, अशी नम्र प्रार्थना व आवाहन!

आगाऊ धन्यवाद.