ऍनिमेशन बद्दल माहिती हवी आहे.

मला एक छोटा ऍनिमेशन (पर्यायी मराठी शब्द काय?) सिनेमा बनवायचा आहे. ह्या संदर्भातील चांगली शिकावू (बेसिक) माहिती मायाजालावर कुठे मिळेल? कोणी मनोगती मला ह्यामद्ये मार्गदर्शन करू शकेल काय?

माझ्याकडे खालिल गोष्टी आहेत.

१. डिजीटल कॅमेरा
२. संगणक
३. वेब कॅमेरा
४. माईक

संगणक प्रणालीः
१. विंडोज मूव्ही मेकर
२. एडोब फोटोशॉप
३. फ्लॅश
४. विंडोज XP

मला साधाच सिनेमा बनवायचा आहे. साधरण १०-१५ मिनीटांचा. ह्या उपलध साहित्यापासून असे काही करता येईल काय?