हा शब्द आला कुठून

   हल्ली तरुण पिढी एकमेकांचा निरोप घेताना 'बाय', 'टेक केअर' असे म्हणते.
'बाय' शब्द बरोबर आहे. समजू शकतो. 'निघतो' किंवा 'निघते'. पण त्यापुढील 'टेक केअर' चे प्रयोजन काय आहे, हे (जुन्या पिढीला)समजत नाही. 'टेक केअर' म्हणजे 'काळजी घे' किंवा 'काळजी घ्या'. अच्छा, भेटू परत हे शब्द किती छान आहेत! 'टेक केअर' ची गरज  काय ? ज्याला सांगितले जाते तो माणूस संकटात नसतो. मग, त्याने कशाची काळजी घ्यावी ?

हे म्हणण्याची सुरूवात परदेशातून झाली असावी. आपली माती लगेच दुसऱ्याचे रोपटे स्वतःत रुजवून घेते.
एकूणच, स्वतःची व स्वतःच्या जीवनाची काळजी घे. मजेत रहा. फार चिंता करू नकोस...इतका सगळा गहन अर्थ लपलेला असण्याची दाट शक्यता आहे.