ती

एका रविवारच्या दिवशी
पहाटेच्या वेळी
गोड झोप माझी
गार त्या गारव्याने उडाली

खिडकीजवळ येवुन मी
सहज खिडकी उघडली
ति उघडताच बघतो तर काय
समोरील अपार्टमेंट मधे
माझी स्वप्नपरी अस्तित्वात आढळली

तिला बघताच माझी
झोप पार खळबळून उडाली
तरी आपण जागे आहोत की स्वप्नात
अशी मनात गडबड झाली

क्षणिक डोळे मिटून मी
तिला र्‍हुदयात उतरविली
र्‍हुदयात तर ती उतरली
पण समोरुन ती नजरेआड झाली

दुसर्‍या दिवसाची तर
वेगळीच कहाणी
खिडकी उघडताच
ती पुन्हा समोर दिसली
वेळ काळ विसरुन मी
तिला नखोशिखांत न्याहळली
उपमा नाही दुसरी कोठली
ती तर भासली रुपमती

होती ती गोर्‍या रंगाची
काया होती सिंहकटी
नितळ तिची कांती होती
आजची ती मस्तानीच होती

काय सांगू अजुन तिचे
परिधानले होते लाल वस्त्र तिने
परिधानलेल्या त्या वस्त्रातुनी
तारुण्य होते तिने लपवीले

केस होते तिचे गडद काळे
गालावर पडती नाजुक खळे
डोळ्यामधे सागराची खोली
ओठ तिचे ते गुलाब पाकळी

थोडा वेळ सरल्याने
झाली आमची नजरा नजर
मी तर झालो घायाळ
चाळला तिने अलगद पदर

काही दिवस असेच सरले
मनामधे तरंग उठले
तीचे मला ठावुक नव्हते
पण माझे मन तिच्या प्रेमात पडले

जात होतो कॉलेजात जरी
मनात होता तिचाच चेहरा
पुस्तक असले समोर जरी
दिसे त्यात तिचाच चेहरा

एक दिवस मला ती
आमच्या कॉलेजच्या गेटजवळ दिसली
तपास लावताच कळले मला
तिनेपण आमच्याच कॉलेजमधे
अडमिशन होती घेतली

नवीन अडमिशन म्हणून
गेलो सहज तिला भेटायला
आणि येथुनच झाली सुरुवात खरी
आमुच्या प्रेमाप्रकरनाला

आता स्वत:हुनच ती
माझ्याशी बोलायला लागली
नोट्स देण्याघेण्याच्या बहण्यानेच का होइना
भेट हि आमुची रोजच होवू लागली

एक दिवस मी तिला
नोट्स मधे कविता लिहुन पाठवीली
यालाच ती प्रेमसंदेश समजेल
अशी मनची समजुत घातली

आणि झाले सुद्धा तसेच
स्विकारला तिने माझा प्रेमसंदेश
विच्यारुनका पुढले काही
कारण यापुढील कहाणी
सर्वांसाठी नाही