मुलांच्या मनाची संवेदनशीलता : (ट्रेंड) कल वाढणारा की कमी होणारा? समाजपोषक की समाजघातक?

नुकतेच, " श्यामची आई " ही कलाकृती ३० वर्षांनंतर परत पाहण्यात आली. श्यामचे संवेदनशील मन बघून कंठ दाटून आला. पहिल्यांदा " श्यामची आई " [सिनेमा नाही म्हणवत] कलाकृती पाहिली, तेव्हा ७ वर्षांचा असेन. त्या वेळी तर रडलोच.

पूर्वी आई - वडिलांनी , गुरू - शिक्षकांनी, केलेल्या शिक्षा, मनापर्यंत पोहोचायच्या. साहजिकच चुकांची पुनरावृत्ती टळायची व यशाचा मार्ग आपोआप सुकर व्हायचा.

वर्तमानातल्या भानावर, क्षणावर मन आल्यावर सहजच प्रश्न पडला.

आजकालची ७ वर्षाच्या मुला - मुलींची मने, "तुलनात्मक"  त्यांच्या आई - वडिलांच्या वेळच्या ७ वर्षांच्या मुला - मुलींच्या मना पेक्षा जास्त संवेदनशील की कमी? बरं हा बदल / कल हा समाज पोषक की घातक ?

(अभिप्राय / प्रतिक्रिया देण्यास पालकत्व असलेच पाहिजे असे बंधन नाही, समाजाचे सूक्ष्म निरीक्षण व योग्य अनुमान काढण्यास सक्षमता, ही देखील अर्हता चालेल. आगाऊ धन्यवाद.)