वसंत फुलला ?

म्हणणे वसंत फुलला ही धूळफेक आता ।

दिसतो ना सारीकडे दगडगोटा राडारोडा ॥

म्हणणे की पंचम कोकिळेचा जीव घेतो प्रेमिकांचा ।

कर्णी असे कोंबला लघुकर्णा भ्रमणध्वनीचा ॥

म्हणणे कुमुदिनी फुलल्या नि तीनपर्णी पेटला ।

जंगले वाचवा जे म्हणती त्यांनीच लावला वणवा ॥

गोजिरे रूप गांवांचे तो भूतकाळ आता ।

दीडविटी भिंतींना शिमिटचा पक्का गिलावा ॥

हुरडा लसूणचटणी वा रसरंगी डाळकैरी ।

खत्रुड खाद्य ते विसरा चायनीज आता प्यारी ॥

आजीच्या वाकळीतिल ऊब विकत मिळते कां?

त्यासाठी वसंत मनी नितची जागता हवा ॥

फसवी प्रलोभने परकी वेळीच नाकारणे निके ॥

निसर्ग सखा जिवाचा त्या आदरे जोपासणे ॥