हत्ती, उंट, घोडे...

जनावरांची खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याने आपल्या मुलाला काही जनावरे खरेदी करण्यासाठी बाजारात पाठवले आणि अशी अट घातली की बाजारात जेव्हढे प्राण्यांचे प्रकार विक्रीसाठी उपलब्ध आहेत ते सर्व प्रकार घेतले पाहिजेत आणि प्राण्यांची एकूण संख्या आणि एकूण किंमतही समान म्हणजेच १०० झाली पाहिजे.

मुलगा बाजारात गेला तेव्हा हत्ती, घोडा आणि उंट अशा ३ प्रकारचे प्राणी उपलब्ध होते. त्यांच्या किंमती,

१) उंट - १ रुपयाला तीन

२) घोडा - १ रुपयाला एक आणि

३) हत्ती - १० रुपयाला एक.

व्यापाऱ्याने सांगितल्यानुसार,

१) तीनही प्राणी घेतले पाहिजेत. (ते किती घ्यावेत ह्यावर बंधन नाही.)

२) प्राण्यांची एकूण संख्या १०० झाली पाहिजे.

३) एकूण खरेदीही १०० रुपयांची झाली पाहिजे.

तर,

व्यापाऱ्याच्या मुलाने किती घोडे, किती हत्ती आणि किती उंट खरेदी करायला हवेत?