ती संपली कहाणी

ती संपली कहाणी
आता नको उजळणी

घडले नवे न काही
अन् कारणे पुराणी

माझ्या सवेच झाली
ही आसवे शहाणी

मी शीळ घालतो, ती
का भासते विराणी?

राजा नसेन मी, पण
गोष्टीत तूच राणी!

.

(जयन्ता५२)