(बोलका)

सर्व विडंबनाचार्यांना साष्टांग नमस्कार करून हा प्रयत्न !

आमची प्रेरणा, अजय जोशी यांची गझल बोलका !

मार फार बोलका असे तुझा,
दादलाच कोडगा असे तुझा

गर्दभास बांधसी पतीसवे,
कोण यात 'वेगळा' असे तुझा?

काल थांबलीस तू  उगा घरी,
'मेनकेस' त्रास हा असे तुझा

आज बोंब पेपरात होउ द्या 
नेहमीच 'शौक' का असे तुझा?

मी निमित्तमात्र पीत राहिलो
पेग, ग्लास, अन् खिसा असे तुझा

लाज तुला पाहताच वाटली 
टॉप नव्हे, पोलका असे तुझा