हे गाणे ओळखा!!

गा  गाल ललगा गागा लगा गा

गा गाल लल गा ललल गाल गागा

ललगाल गागा लगागा लगा ल

लल गालगा गा गागाल गागा ....ध्रु

-------------

आम्हास कळले नाही जराही

केलेस कोठे हृदय माझे भंग

तू आपलेसे न केलेस मज अन्

न होऊ दिला अन्य कोणाचा संग

....न होऊ दिला अन्य कोणाचा संग

द्रोहात तुझिया मी का होऊ दंग

स्वतःच्याच प्रेमा मी लज्जित आहे.... १

------------------

आता न मागूनि येणार कोणी

असे कोण देईल जो साद तुजला?

मागे वळूनी कुणा पाहसी रे?

माझ्या मना, थांबवी कोण तुजला?

....माझ्या मना, थांबवी कोण तुजला?

सुखे सर्व लखलाभ होवोत तुजला

जाण्या विरूनी मी खंगीत आहे....२

                                      ---------------------कृष्णकुमार द. जोशी