मराठी पाऊल पडते पुढे?

काल सा रे गं म प चा एपिसोड बघितला... सगळ्याची गाणी छान झाली...मला अमृताचं "गुणी बाळ असा" गाणं आवडलं..ते तिने गायले म्हणून नव्हे तर मूळ गाणंच छान आहे..
मधुराचं "ही वाट दूर जाते"... छान च गायली...पण आताशा हे सा रे गं म प ही बोअर व्हायला लागलं आहे...
गाणी म्हणण्याचा कार्यक्रम मग त्यात जुजबी माहिती न देता परीक्षकाच्या खुर्चीवर बसलेली मंडळी उगाचच्या गोष्टीवर का बोलतात हे मला न उलगडलेले कोडे आहे.. मलाही प्रत्येक गाण्याच्या मागे असलेल्या गमतीजमती माहिती करून घ्यायला आवडते पण मग त्यासाठी एखादा वेगळा कार्यक्रम असावा (इतिहास..गाण्याचा) वगैरे नावचा  
खरंतर आता सगळेच प्रोग्रॅम्स, सगळ्याच मालिका अगदी रटाळ वाटतात विशेषतः झी मराठीवरच्या..अगदी बोटावर मोजण्याइतकेच प्रोग्रॅम्स..मालिका तर सगळ्याच प्रेडिक्टेबल..सकाळच्या घाईत कुणाला वेळ आहे "गुड मॉर्निंग महाराष्ट्र" बघायला...कुठलीही छान गाणी जर लावलीत तर गृहिणी...कामावर जाणारी लोकं सगळेच काम करता करता गाणी ऐकू शकतात..जेव्हापासून हे चैनल सुरू झाले आहे तेव्हापासुन गुड मॉर्निंग महाराष्ट्र सुरू आहे पण त्यात काहीही बदल नाही...आणि हे तरी ठीक...ई टि व्ही वाल्यांनी तर कहरच केला..सकाळ्च्या वेळेला कुणी घर सजावटीच्या वस्तु कश्या तयार कराव्यात हे बघेल का? हे सगळे पाहुन माझ्या नवरेबुवांना हसु आवरणे कठीण जाते..
सुर ताल आता जख्ख म्हातारे झाले आहे त्याऐवजी कुठ्ल्या दुसर्या कार्यक्रमांचे आयोजन का केले जात नाही? हे तर कळतच नाही..यांच्याकडे प्रतिभावंत लोकांची कमी आहे की नक्की काय प्रॉब्लेम आहे हे माहिती नाही...मुळात प्रेक्षकाची काय गरज आहे हे कुणालाही कळत नाही..
अरे जर स्टार प्लस चैनल वर रटाळ मालिका चालू आहेत तर मराठी चॅनल वाल्यांनो तुम्हीतरी तुमचा स्तर टिकवा...आणि प्रेक्षकांना काही तरी नवीन द्या..जुन्या दर्जेदार मालिका आठवल्या तर असं वाटतं की काळाच्या ओघात मराठी माणूस आपली प्रतिभा गमावून बसलाय की काय?
अगदी मोजता येतील इतकेच चित्रपट...त्यातील सुमार गाणी..सगळे संगीत दिग्दर्शक कुठे गेलेत काय माहिती?...(सारेगमप मध्ये परीक्षक म्हणून  )
महाराष्ट्रातील संगीत म्हणजे काहीच कुटुंबांची मक्तेदारी नव्हे हे लोकांना कधी कळणार कोण जाणे ..माझ्यामते सगळ्याच जुन्या नव्या गायकांनी या कलेला योग्य तोच न्याय दिला आहे...आणि जसा सकाळी उगवलेला सूर्य संध्याकाळी मावळतोच..तसेच कलाकाराचे आहे..
प्रत्यक्ष कलाकाराला त्याच्या कारकीर्दीबद्दल एवढे अप्रूप नसावे...आपणच सारे त्याचं भांडवल करतो असं मला वाटतं...जितके गाण्याचे कार्यक्रम आहेत तितके कवी संमेलन, संगीत दिग्दर्शनाची प्रतियोगिता का असत नाही...प्रतिभेला चालना,मोठं व्यासपीठ कोण मिळवून देणार? ही आजची गरज आहे...नाहीतर आपण आयुष्यभर "मराठी पाऊल पडते पुढे" आळवत बसू...आणि बाकीच्या प्रांतातील लोकं मात्र कित्येक पावलांनी मराठी माणसापेक्षा पुढे असतील..