हेही म्हणा, तेही म्हणा...
नवखा दिसे.. 'मी मी' म्हणा !
पहिली असो, दुसरी असो..
सुंदर दिसे.. माझी म्हणा !
गझला करो, कविता करो..
अपुला असे भारी म्हणा !
तंत्री असे, जंत्री जमे..
संत्रे मिळे.. मंत्री म्हणा !
पंजावरी दुर्री पडे...
दृष्टी तशी तिर्री म्हणा !
चकली नको? झाले बरे..
खाता उडे कवळी म्हणा.. !
सागर तिरी भेटे परी..
कुठलीतरी पटली म्हणा !
अवघड गझल ! बक्कल तुटे ?
पुरवू तुला दोरी म्हणा..!
सांगू कसे काही? 'अजय, -
चुकतो कुठे हल्ली म्हणा.. !'