(फसवणूक)- एक 'जालीय' व्यथा.

आमची प्रेरणाः
अ-मोल यांची सुंदर रचना- फसवणूक.
दुवा क्र. १

--------------------------------------------

मुखपृष्ठ अगदी कोरं करकरीत
मी पाठवलेल्या कवितांची विडंबनं होऊन
उलटून गेली असतील
बरीच पाने.
पुण्यातल्या माणसासारखं,
कागदावरही उमटत नाहीत
तुझ्या कौतुकाची अक्षरं.

दाही दिशांना प्रतिसादांचे
खडे मारून पाहावं
३६० अंशात
एखादाही चुकार सदस्य
नाहीच.
सारा इनबॉक्सही
ओकाबोका.

चर्चेत खरडावे
चार बोल
तर सगळे विषयांतर/रोख
अलर्ट प्रशासकाने
उडवलेले

आता पाककृती वाचायचीही भीती वाटते
न जाणो तिथलेही प्रतिसाद
अंतर्धान पावलेले असतील?

'ओळख' फुटली की काय?

असं स्वतःला विचारतांनाच
नव्या प्रतिसादाचा स्पर्श पानात
आणि माझं
घोडं गंगेत सुस्नात!

दुसऱ्यांना किती फसवावं माणसानं?

+++++++++++++++++++++