संपूर्ण भारतात एकच बोर्ड व परीक्षा. शिक्षणक्षेत्रातील शासनाचा प्रस्ताव

शिक्षणक्षेत्रातील शासनाचा प्रस्ताव - संपूर्ण भारतात एकच बोर्ड व परिक्षा. असावी की नसावी?........... एक सखोल चर्चेचा विषय.

चर्चा होणे गरजेचे आहे.....................

होयना? मग विचार कसला करताय? करा सुरुवात...

पारावर, कट्ट्यावर, झोपाळ्यावर, बैठकित बसल्यावर.... हे होणं गरजेचे आहे, हे बरोबर व योग्यच आहे, नाही; नाही, असं कसं? हे चुकीच आहे, बळजबरी, मनमानी, राजकारणी धोरण.... असं आणि असंच बरच काही... गप्पांच्या ओघात बडबडणं, तोंडच्या वाफा दवडणं काय कामाचं?

चला तर मग हिच वेळ आहे, हा प्रश्न आपल्या घरातला समजून, अत्ता नसेल तर भविष्यात डोकावून पाहिल्यावर, पाल्याच्या दृष्टीनं महत्वाचा, घरातला बनवून - मानून, ह्या निर्णायाच्या प्रत्यक्ष परिणामांना सामोरं जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी-पालकांनी बोलतं, लिहितं होण्याची, आपले मत समाजापुढे मांडण्याची. इतकं मनापासून, भरभरून की, आपला - जनतेचा आवाज... लोकमत, त्याच समाज्याच्या लोकप्रतिनीधींच्या कानाभोवती घोंगावेल... हा सततचा भडिमार बघून तो आवाज संसदेत नेण्याशिवाय त्यांना पर्याय राहणार नाही.

मग वाट कसली पाहताय...? माझ्या टिपण्णीवर चर्चा, मतप्रदर्शनांची टीकटीक करण्यापेक्षा, स्वत:च मत टंकलिखित करायला घ्या...

अभिनंदन...   विचार सुरू केलात... आता लिहिणं ओघानं होईलच.... लिहिते व्हा...!!!

धन्यवाद...!!!