वांग्याचे बेसनातील काप

  • मध्यम आकाराची ३-४ वांगी
  • बेसन अंदाजे अर्धी वाटी
  • चवीप्रमाणे तिखट, मीठ, चिमूटभर हिंग, धणे-जिरेपूड अर्धा ते पाऊण चमचा, आमचूर पावडर थोडीशी
  • गोडा मसाला/ गरम मसाला पाव चमचा
  • तेल
१० मिनिटे
२ जणांसाठी

सर्वप्रथम वांग्यांची डेखे काढून, त्यांच्या गोलाकार पातळ चकत्या कापून त्या मीठाच्या पाण्यात बुडवून ठेवाव्यात. एका मोठ्या ताटलीत बेसन व इतर पदार्थ एकत्र करून नीट मिसळून घ्यावेत. वांग्यांच्या कापांचे पाणी पिळून काढावे व ते काप ह्या मिश्रणात घोळवून नॉन स्टिक पॅनमध्ये थोड्याशा तेलात गॅसवर मंद आंचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यावेत.

उत्कृष्ठ चव!

करून पहा, अतिशय सोप्पे व चविष्ट!

चुलतबहिणीच्या सासूबाई