अस्सल मराठी टुलबार

नुकताच मी एक मराठी टुलबार तयार केला आहे आणि तो तुम्हाला नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे. या टुलबारचं वॅशिष्ट म्हणजे यापुढे तुम्हाला जालावर उपलब्ध सर्व मराठी वेबसाईट्सना अगदी सहजतेने भेट देता येईल. शिवाय सर्व मराठी लोकांना एका क्लिकच्या अंतरावर आपापसात चॅटींग करण्याची सोय उपलब्ध होईल. शिवाय या टुलबारचा उपयोग करून तुम्ही फक्त जालावरील मराठी अंतर्गत शोध घेऊ शकता. तुम्ही कोणत्याही सोशल नेटवर्कशी जोडलेले असाल, या टुलबारवर १५ सोशल नेटवर्कस ची यादी आहे. त्यामुळे तुम्हाला आता त्यांच्यांपर्यंत पोहचणं अधिक सोपं जाणार आहे. शिवाय खास मराठी लोकांना नजरेसमोर ठेऊन मनोगत, मिसाळपाव, उपक्रम, मराठी विकिपेडिआ, मराठी ब्लाऍगविश्व, मराठी माती, सकाळ, महाराष्ट्र टाईम्स इ. अनेक मराठी वेबसाईटस एका क्लिकच्या अंतरावर असतील. तुम्ही या इथे दिलेल्या प्रतिक्रियांना गृहित धरून त्यात नंतर अनेक सुधरणा करण्यात येतील. तरी सर्वांनी हा टुलबार एकदा वापरून पाहावा. या इथे भेट द्या. दुवा क्र. १  आणि बॅनरवर क्लिक करा.