पूर्ण काय?
ध्वनी कुठेसे विरून गेले,
लहरींमधुनि सरून गेले,
ठसे राहिले शब्दांचे;
अर्थ कुठेसे हवेत जिरले, ठाव राहिले भावांचे।
अवतीभवती नाचून गेले,
बोलबोलुनी घुमून गेले,
चित्र सरकले वर्णांचे;
आर्त राहिले, शून्य राहिले, उगाच अक्षरचिह्नांचे॥
विचारांतुनी रुतून गेले,
मध्येच सारे निवून गेले,
सत्त्व हरपले शब्दांचे;
मूर्त हरवले, पूर्ण राहिले, मिळून अक्षरब्रह्माचे॥
मुग्धा रिसबूड.
रचनाकाल : नारळीपौर्णिमा, दिनांक ५ ऑगस्ट २००९.