प्रश्न पडत राहतात.
पावसाइतक्याच सहज आणि अविरतपणे.
कुठलही कारण पुरेसं असतं त्यांना
किंवा, कधी कधी कारण मिळालंच नाही तरी चालतं!
अवघ्या अस्तित्वाला वेढून
प्रश्नांचे ढग जेव्हा चहूबाजूला गर्दी करत असतात,
तेव्हा कुठेतरी एखादा अंकुर असतोच
उगवण्यासाठी आसुसलेला
आणि एक चातकही असतो कुठेतरी
चोच उघडून बसलेला...
मान्य आहे,
काही वांझ ढग असतात आकाशात
पण म्हणून काही पावसाचं महत्त्व कमी होत नाही
तसंच, प्रश्नांचंही.
प्रश्न पडत राहावेत.
उत्तरं मिळालीच पाहिजेत, असं थोडंच आहे?
++++++++++++++++++++++++++++++