भ्रष्टाचारविरोधात अनिवासी भारतीयांचा दबावगट हवा : मेधा पाटकरांचे विचार

सात सप्टेंबरच्या ईसकाळात हे वाचायला मिळाले.

ईसकाळातली मूळ बातमी : अनिवासी भारतीयांचा दबावगट हवा - मेधा पाटकर (ईसकाळ दि. ६ सप्टेंबर २००९)

ह्या बातमीतले महत्त्वाचे मुद्दे असे :

डॉ. जगन्नाथ वाणी या कॅनडानिवासी लेखकाच्या  'अंधारातील प्रकाशवाटा' या आत्मनिवेदनपर पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन करतेवेळी "अनिवासी भारतीय मंडळींनी काही काळापुरते देशात येऊन "कॉर्पोरेट' मंडळींत वावरण्यापेक्षा इथल्या अन्याय, भ्रष्टाचाराविरोधात दबावगट निर्माण करायला हवा आणि विषमतेच्या विरुद्ध सकारात्मक हस्तक्षेप करायला हवा" ... असे विचार मेधा पाटकरांनी मांडले.

"एनआरआय नोकरी-व्यवसायानिमित्त परदेशात राहतात, कर्तृत्व गाजवतात; पण जेव्हा त्यांच्या "देशीपणा'ची गरज असते, तेव्हाच त्यांचे देशीपण हरवून गेल्यासारखे वाटते. ते देशातही "कॉर्पोरेट' म्हणूनच वावरतात. येथील समाजव्यवहार, अन्याय, रूढी, परंपरा यांच्याबाबतीत "एनआरआय'चे योगदान काय असावे, याचा पुनर्विचार होण्याची गरज आहे. तेथील संस्थांनीही केवळ पुरस्कार देण्यापेक्षा अन्याय्य वास्तवाबाबत हस्तक्षेप केला पाहिजे. एकीकडे अंधार आणि त्याच वेळी दुसरीकडे ऊर्जाधारित उधळपट्टी, ही विषमता कमी करण्यासाठी त्यांनी दबावगट तयार केला पाहिजे. ही कृत्रिम ऊर्जा माणसाच्या हातातील नैसर्गिक ऊर्जाही संपवून टाकणारी आहे" ... अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.

डॉ. वाणी कॅनडात राहूनही इथल्या मातीशी, सामाजिक कार्याशी जोडलेले आहेत इथल्या पीडित, शोषित वंचित दडपल्या गेलेल्या आदिवासी, भूमिहीन, श्रमिक, वस्तीवरच्या लोकांमधील सर्जकता, निर्मितीचे तेज आणि त्यांच्या संघर्षातील सकारात्मक भाव त्यांनी जाणला आहे ... असे उद्गार त्यांनी काढले.


१. आपण कोणी ह्या प्रकाशनसमारंभाला गेला होता काय?

२. आपण अंधारातील प्रकाशवाटा हे डॉ. वाणी ह्यांचे पुस्तक वाचले आहे काय?

३. डॉ. वाणींच्या कार्याबद्दल कुणाला काही अधिक माहिती आहे काय?

४. मेधा पाटकर म्हणतात त्याप्रमाणे दबावगट तयार होऊ शकेल असे आपल्याला वाटते का? का?