सिद्ध लाडू

  • तांदुळाची तयार उकड दोन वाट्या
  • एक चमचा जिरेपूड, अर्धा चमचा आख्खे जिरे, चवीनुसार मीठ
  • तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  • थोडी कोथिंबीर बारीक चिरून
  • एक चमचा तेल व दोन चमचे तूप
२० मिनिटे
दोन माणसांकरीता.

गणेश चतुर्थीला मोदकांबरोबरच सिद्धलाडूचाही नैवेद्य दाखवतात. नैवेद्याच्या सिद्धलाडूत मिठाशिवाय काहीही घालत नाहीत. मात्र नंतर आपल्याला खाण्यासाठी सिद्धलाडू अशाप्रकारे बनविले जातात. हे लाडवांसारखे दिसत नसूनही याला सिद्धलाडू हे नांव का पडले आहे हे बरेचदा आजीला विचारले परंतु तिलाही त्याचे उत्तर माहीत नव्हते. त्यामुळे ती नेहमी म्हणे, " हात मेल्यांनो, खायचे सोडून नको ते प्रश्न कशाला विचारता रे. "

मोदक करून झाले की उरलेल्या उकडीमध्ये चवीनुसार मीठ, जिरेपूड व थोडे आख्खे जिरे, हिरवी मिरची व कोथिंबीर घालून उकड मळून घ्यावी. नंतर हाताला किंचित तेल लावून उकडीचे छोटे छोटे गोळे करून त्यांना आपण जश्या गाठी मारतो तसा आकार देऊन कुकरमध्ये वाफवून घ्यावे. गरम असतानाच थोडेसे तूप सोडून खायला द्यावे. जिरे-मिरचीमुळे सुंदर चव लागते.

सिध्दलाडू

तांदुळाच्या उकडीच्या निवगीऱ्या करतात. त्या थापून करतात. सिद्ध लाडू हे तसेच फक्त आकार वेगळा.

आजी