वरदाची दिवाळी.

वरदाची दिवाळी

रचनाः वरदा रिसबूड.(वय : नऊ वर्षे)


आली दिवाळी दिवाळी,
रांगोळ्या त्या घरोघरी।
दारी पणती वाढवी
दिवाळीची शोभा न्यारी॥

आली दिवाळी दिवाळी,
काढायची शुभरांगोळी।
दीपमाळ ती सुंदर
लावू आपण मंडळी॥

आली दिवाळी दिवाळी,
वस्त्रे नवीन ती छान।
घेउनी भेटाया येती
पाहुणेही भेटी छान॥

आली दिवाळी दिवाळी,
मोठ्या आनंदाचा सण।
येई दारात पाहुणा,
उतरते लिंबलोण॥

रचनाकाल : ९ ऑक्टोबर, २००९.