बऱ्याच वेळा Vs. बऱ्याच वेळा

  बऱ्याच वेळा Vs. बऱ्याच वेळा


भलताच ब्रँड आता, मिळतो बऱ्याच वेळा
माझाच पानवाला, छळतो बऱ्याच वेळा

बेगॉन याचसाठी, मी मरणार नाही
शिंकून जीव माझा, जातो बऱ्याच वेळा

अकलेनुसार माझा, पडतो उजेड कोठे
चुपचाप लोड शंटिंग, करतो बऱ्याच वेळा

देऊ नकोस पेला, मज खरकटा असा तू...
लिप-स्टीकचा ठसाही, दिसतो बऱ्याच वेळा

सवयी नुसार  नाही, सिग्रेट  फ्री तुम्हाला...
लांबून फक्त टाटा, म्हणतो बऱ्याच वेळा

प्रत्येकदा असा तू, घेऊ नकोस संशय !
लेंगा असाच माझा, मळतो बऱ्याच वेळा

मोरी समोर माझ्या, कोणी तरी अचानक्
घसरून पाय त्याचा, पडतो बऱ्याच वेळा


                                    -यादगार