आस्ममची भास्मषा ..

लेखाच नाव पाहून गोंधळुन गेलात ना...!तर अस गोंधळु नका ते कोड उलगडेल
पुढे या लेखातच.कालच  मला लहानपणी आम्ही शाळेत
बोलत असलेल्या काही भाषांची आठवण आली.तशी  मुळ भाषा मराठीच असायची पण
त्यात काही नियम वापरून शब्द उलटसुलट केलेले असायचे शब्द.खरतर च ची भाषा
पाठ्य पुस्तकातच होती.कितविला ते काही आठवत नाही पण तिला बेस मानून आम्ही
बरयाच स्वतंत्र भाषा तयार केल्या होत्या.नशीब त्या पुढे विकसित नाही
झाल्या नाहीतर आम्हालाही त्या भाषेसाठी एखादा पक्ष काढावा लागला असता.तर
अशाच 'च' ,'भ','ल','स्म' च्या भाषा त्यावेळी आमच्या वर्गात अस्तित्वात
होत्या.कधी कधी तर दोघ तिघ मित्र मिळून सुद्धा एखादी नविन भाषा बनवायचे
आणि आपापसातील टॉप सीक्रेट्स सर्वांसमोर सर्वाना न समजता जेम्स बोन्डच्या
थाटात शेअर करायचे कारण त्यांच्या भाषेचे नियम फक्त त्याना माहिती असायचे.

तसेच  खालच्या इयात्तेतिल या भाषेंबाबत ज्ञान नसलेल्या मुलांसमोर तर
आम्ही आवर्जुन ह्या भाषेचा वापर करीत असू .ते  वेगळ्याच कुतुहलाने
आमच्याकडे बघत असत.आमचीही कोंलर मग टाइट व्हायची आणि  आम्ही उगाचच भाव
खायचो काहितरी वेगळ ज्ञान असल्याच्या खुशीत.तर हया अश्या भाषांमधल्या
आमच्या शाळेत विशेष लोकप्रिय झाल्या होत्या त्या दोन भाषा एक 'च' ची आणि
एक 'स्म' ची कारण त्या आम्ही घरापर्यंतही  पोहोचवल्या होत्या.मग कधी घरात
या भाषा बोलायची हुक्की आली की आईच्या डोक्याला ताप उगाचच मग तिच्याशी
त्या भाषेत बोलायाचे तिला त्या भाषेचे नियम सांगायचे.मला स्वत:ला सुद्धा च
आणी स्म च्या भाषा अगदी व्यवस्थित अवगत होत्या.आम्ही त्यावेळी त्या इतक्या
फ्लुएंटली कशा बोलायचो ते कोड मला अजु़नही उलगडत नाही. .असो हे सगळ वाचून
तुम्हालाही वाटत असेल न हया भाषा शिकायला.तर या दोन भाषांचा खजिना
तुमच्यासमोर उघडत आहे. :-)

'च' ची भाषा बोलतांना ...
'वाक्यातील सर्व शब्दांचे मुळ अक्षर उलट करून पहिल अक्षर च घ्यायचे.'
उदा:-

१.  मराठी      : माझं नाव देवेन
च ची भाषा    : चझंमा चवना चनवेदे
२. मराठी       : तू काय करतोस
च ची भाषा     : चतू चयका चासतोरक

'स्म' ची भाषा बोलतांना ...
'वाक्यातील प्रत्येक शब्दात दुसर अक्षर स्म घ्यायच '

उदा:-

१.  मराठी        : माझं नाव देवेन
स्म ची भाषा   : मास्मझं नास्मव देस्मवेन
२. मराठी        : तू काय करतोस
स्म ची भाषा  : तूस्म कास्मय कस्मरतोस

आस्माहे नास्म गस्ममतीशीर... चस्मला इस्मथेच थांस्मबतो.