लागूंची विधाने

काही वर्षांपूर्वी डॉ.लागूंचे एक विधान वाचले होते. ते असेः

"नटाने एखादी भूमिका केली म्हणजे त्याने त्या गोष्टीला पाठिंबा दिला असे होत नाही. मी बलात्कार करणाऱ्याची भूमिका करतो, म्हणजे मी बलात्काराचे समर्थन करतो...असे म्हणणे चुकीचे ठरेल."
परवाच लागूंची मुलाखत एका वाहिनीवर पाहिली, ऐकली.
तीत ते म्हणतात, "भूमिका पटली नाही तर नटाने ती करु नये. त्यामागील विचार पटल्यासच भूमिका करावी."
प्रश्न असेः
  • विधाने विसंगत आहेत का?
  • विसंगत नसतील तर त्यांना आणखी काही म्हणायचे आहे का? उदा. खलप्रवृत्तीची भूमिका; भूमिका म्हणून योग्य नाही पण ती व्यक्तिरेखा खल कशी झाली याचे स्पष्टीकरण लेखकाने दिल्यास व त्यानंतर तिच्याबद्दल सहानुभूती वाटल्यास भूमिका करावी...असे काहीसे त्यांना म्हणायचे आहे का?